स्त्री म्हणून आली जन्माला
त्याच माझी काय चूक होती,
वासनेने भुकेलेल्या गिधाडाची नजर,
तुम्हा नर जातीतच होती..
मला मिळालं स्वातंत्र्य,
मुक्तपंखांनी वर आकाशी उडण्याचं,
त्यावरही ह्या समाजाची,
सतत कुरबूर होती..
आले मी कोवळ्या वयात,
लागले हसू गालातल्या खळ्यातं,
चमकू लागले ज्वानीचे मोती,
माझ्या गं या गळ्यात..
अन अचानक घात झाला,
रातीच्या चांदण्यात,
पदरावर माझ्या तो
राकट हात आला...
लूटून नेली रत्ने सारी,
माझ्या या नाजूक सौंदर्याची,
आता उरलीये फक्त मी,
खोल जखम घेवून बलात्काराची..
ना तो वरचा आला वाचवायला,
ना क्षण मिळाला निसटून जायला,
अब्रुचे तोडलेच होते लचके त्याने,
मग का जिंवत सोडले,
असे क्षणा क्षणाला मरायला..
-- सुर्यकिरण

0 प्रतिसाद..:
Post a Comment