"गुड बाय टू ऑल ह्युमन बिईंग" ...
काय दचकलात ना, हे असं कायं शिर्षक दिलंय म्हणून ! हो असचं काहीसं आहे हे मी माझ्याबद्दल नाही लिहीलयं. हे तुमच्या आमच्यातल्या हिडन पण अविभाज्य अश्या घटकाबद्दल लिहीलय अन तो घटक म्हणजे
"मन". हो हो तुमचं आमचं मन.
अशक्य आहे पण कधी मनाने ठरवलं की सगळ्या मानवी जातीला गुडबाय करून निघून जायचं तर काय होईल? याचा विचार करा जरा. कारण आपला आपल्या मनावर किती ताबा आहे हे जरा स्वतःला विचारून पहा. क्षणिक सुखासाठी आपण मनाचे काय हाल करतो, कित्येकदा मनाला न पटणार्या पण आपल्या फायद्याच्या गोष्टी आपण कळत नकळत कश्या घडवून आणतो. खरतरं या मनाला आपल्या आयुष्यात काही तरी स्थान आहे ते आबादित राहीलंय का सांगा पाहू. कित्येकदा आपण बोलतो की मनात ठरवलं की आपोआप सगळ्या गोष्टी घडून येतात. पण तितक्या तन्मयतेने आपण आपल्या मनाला वाव देतो का? ठाऊक आहे वय जसं वाढत जातं तशी शरीराची जडणघडण होते अन परीणामी मनाचीही होते. पण जडणघडण करून घेणे यात काहीचं वावगं नाही कारण या पृथ्वीतलावरची प्रत्येक जिवसॄषटी आपल्यात बदल करू पाहतेच की. पण आजकाल माणसातले बदल हे मनाविरुद्धच होत चालले आहेत असं नाही का वाटत तुम्हाला.
मुल जन्माला येतं तेव्हा त्याला मन म्हणजे काय हे ठाऊक नसतं ते जस जसं मोठं होत जात तस तश्या त्याचा जिवनाचा प्रवास सुरु होतो.आईला आई म्हणायचं अन ते ही न विसरता आपल्याच आईला आई म्हणायचं हे त्याला कसं बरं कळत असेल. कारण त्याच्या मनात त्या गोष्टी सहज अगदी लाटेवर शिडाची बोट डोलत रहावी ना तसं डोलत असतं अन ते जिवनाचा किनारा येईपर्यंत तसचं राहतं. असचं असतं मन.. पुढे शाळेत जातात मुले तेव्हा त्याना फुले, फुलपाखरं , गोड धोड असं काही आवडायला लागतं ही सुद्धा मनानेच ठरवलेली आवड असते ना? मग आज ती आवड आपण त्यांना ठरवू देतो का. एकदा विचारून पहा स्वतःच्याच मनाला. आजकाल लहान मुलांनासुद्धा संस्कारवर्गाच्या शिकवण्या लावाव्या लागतात कारण मोठ्यांच्या संस्कार मनावर त्यांचा विश्वास राहीलेला नाही का त्यांनी मोठ्यांच्या काळात सुद्धा त्यांनी सुद्धा संस्कारवर्गच लावले होते का. वाल्मिकी ऋषीनी रामायण लिहलं ते त्यांच्या मनात पुढच्या पिढिवर संस्कार व्हावे याच उद्देशाने ना. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना मांडली अन ती पुर्णत्वाला नेली ती सुद्धा याच मनाच्या हाकेतून ना ? मग आज तुमच्या मुलाला का तुम्ही शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक , राजगूरू नाही बनवत ? इंजिनिअर, डॉक्टर , वकिल हेच त्यांनी व्हावं अशी अपेक्षा ठेवून तुम्ही त्यांच्या कोवळ्या मनावर तुमचे हट्ट लादता, ज्यांचे हट्ट करायचे मन त्यांच्यावरचं तुमच्या मोठ्यांचे हट्ट किती विशिप्त वागतो ना आपण याचा विचार केलाय कधी. आहो फुलाला फुलायचंय , सुंगध पसरवायचाय यासाठी तुमच्या सक्तिचा विचार करतं का त्या फुलाचं नाजूक मनं ? नाही ना मग तुम्ही सुद्धा तुमच्या फुलाला-मुलाला फुलू द्या ना जसं फुलायचयं तसं सुगधू द्या ना त्याला त्याच्या सीमेत. तुम्ही फक्त त्याचं मन भरकट्णार नाही यावर लक्ष द्या. अवघड वाटतं का तुम्हाला... ?
तरूणवयातली मने फार डेलिकेट अन सेन्सेटिव्ह असतात असं खूप जण म्हणतात. कारण मुले वाया जाण्याचा तो एकच काळ आपल्या देशात मानला जातो. पण मने वाईट नसतात कधी कधी परिस्थितीने, आपल्या लादलेल्या निर्बंधाने ती मने भरकटतात. तुम्ही दिशा घालून दिल्या की ती मने अपोआप त्या दिशेने आपली वाट ठरवतात अन योग्य ती सीमा राखूनचं. काल वर्तमान पत्रात वाचलं ऑस्ट्रेलियातली १६ वर्षाची वॅट्सन नावाची मुलगी स्वतःच्या जहाजातून सागरी जगप्रवास केला तेव्हा तो प्रवास सुरू करण्यापुर्वी काय आलं असेल तिच्या मनात, तो प्रवास करताना काय अनुभवलं असेल तिच्या मनाने , अन तो प्रवास पुर्ण झाल्यावर कसा व्यक्त केला असेल आंनद तिच्या मनाने याचा विचार केलाय कुणी, नाहितर फक्त तिच्यावर स्तुतीसुमने उधळून तिच्या मनाच्या या कारकिर्दीला एक इतिहास किंवा जी के च ज्ञान म्हणून बंद केलं ना तुमच्या मनात. अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यांच्या मनाची परिक्षने करण्याची गरज आहे. उदा. कृष्णा पाटील, सचिन तेंडूलकर , लता मंगेशकर.. काय घडलं असेल नेमकं, त्यांच्या मनात?
आणखी लोकांचा एक मोठा गैरसमज तो म्हणजे उतारवयाला लागलं की मन बिन काय नसतं , आता फक्त उरलेली आयुष्याची गणितं सोडवायची ती सुद्धा सुटली तर नाहीतर तोपर्यंत आपल्या श्वासांची शृंखला तूटेलच की. अशक्य आहे हे जोपर्यंत हा देह सजिव आहे तो पर्यंत मनाची सूटका होणे अशक्य ! मनाचं कस आहे माहिती आहे का .. पतंगाला व्यवस्थित कण बांधली की मग ती उंच गेल्यावरही काटल्याशिवाय कटत नाही तसचं आहे मनाचं, त्याला योग्य दिशा हवी , योग्य कमांड हवी मग बघा कसं ते वर आकाशी डोलत राहतं.
तुम्ही विचार करायला सुरवात केली असेल वरचं सगळं वाचून की एवढं सगळं लिहिलयं मग कसाब सारख्या विद्रूपलेल्या व्यक्तीचं काय, अतिरेक्यांना पण असतं ना मन मग त्यांच काय ? आहो त्यांच्या मनानेच त्यांचातून सुटका करून घेतली असेल इतके निर्दयी अन पाषाणदेही आहेत ते. आता तुम्ही म्हणाल देवही पाषाण देही आहे मग तो त्यांच्या सारखा कसा नाहीये. आहे पाषाण देहात जरी असला तरी आपल्या मनात त्याच्याबद्दल असणारी श्रद्धा, आस्था अन विश्वास त्याने मोडलाय का कधी सांगा बरं पण ह्या लोकांनी आपला विश्वासचं काय पण मनं सुद्धा बिथरवली आहेत. हत्या अन आत्महात्या यातला फरकं काय सांगता येईल तुम्हाला ? माझ्यामते मनाच्या विरुद्ध क्रुरतेने केलेलं कर्म म्हणजे हत्या, अन मनाच्या विरुद्ध आपल्याच मनाची केलेली हत्या म्हणजे आत्महत्या होय. आज माझा मलाच कंटाळा आलाय हे ऐकून जर मनाने ठरवलं की हे शरीर आपण सोडायचं, जगात चाललेल्या कळत नकळत राग,लोभ, द्वेष या गोष्टींचा मनाला तिरस्कार वाटू लागला तर मनही वैतागून म्हणेल ना कधीतरी... कंटाळा आलाय मला या सगळ्याचा...

.. अन तो कंटाळा त्याला खरचं असह्य झाला तर .... असोत मला ह्या लेखाच्या शेवटी एक गाणं आठवलं जे आपण शाळेत असताना प्रार्थना म्हणून गायचो..
इतनी शक्ती हमे देना दात, की मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते पे हम से , भूलकर भी कोई भूल ना हो ना...
खरचं क्षणिक सुखासाठी लखलाभ मनाचा बळी देताना आवर्जून विचार करा, कारण अखेर सुख हे मनाच्या सहजतेवर अवलंबून असतं अन ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या मनाला चांगली जमते. मनाला जमवून घेणं पटतं नाही तरी आपण जमवून घेतो, मनाला सामावून घेणं पटतं अन आपण तेच तर करतं नाही. तेव्हा आपल्यातल्या मनाला जपा , त्याला काय हवयं काय नकोयं याचा विचार करा अन खुशाल जिंदगी जगा. कारण त्याने खरचं गुडबाय म्हटलं तर आपल्याला दुखात रडताना खांदा उरणार नाही, माणुसकी , आपूलकी या सारखे शब्द कुठेतरी ऐकले होते असचं म्हणायची वेळ येईल.
रामदास स्वांमीचे श्लोक आठवले.. हा लेख लिहिताना ...
समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक (०१ ते २०)
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।। मुळारंभ आरंभ तो निगुर्णाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ।। १ ।।
मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।।
जनीं निद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य ते सर्वभावें करावें ।। २ ।।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधीं वदावा ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ।। ३ ।।
मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापकामा नको रे ।।
मना सर्वथा नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सारवीचार राहो ।। ४ ।।
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।।
मना कल्पना ते नको विषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ।। ५ ।।
नको रे मना क्रोध हा खेरकारी । नको रे मना काम नानाविकारी ।।
नको रे मना लोभ हा अंगिकारूं । नको रे मना मत्सरू दंभभारू ।। ६ ।।
मना श्रेष्ठ धारिष्ट जींवी धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ।। ७ ।।
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नाववावें ।। ८ ।।
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अति स्वार्थबुध्दी न रे पाप सांचे ।।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दु:ख मोठे ।। ९ ।।
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी ।।
देहेदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकं सदा स्वस्वरूपी भरावें ।। १० ।।
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ।।
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें । तयासारिखें भोगाणें प्राप्त झालें ।। ११ ।।
मना मानसीं दु:ख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ।।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ।। १२ ।।
मना सांग पां रावणा काय झालें । अकस्मात तें राज्य सर्वै बुडालें ।।
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं । बळे लाभला काळ हा पाठिलागीं ।। १३ ।।
जिवा कर्मयोगें जनीं जन्म झाला । परि शेवटी काळमूखीं निमाला ।।
महाथोर ते मृत्युपंथे चि गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ।। १४ ।।
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ।।
चिंरंजीव हें सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ।। १५ ।।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढें जात आहे ।।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यांतें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ।। १६ ।।
मनीं मानव व्यर्थ चिंता वहावें । अकस्मात होणार होऊनि जातें ।।
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । मतीमंद तें खेद मानी वियोगें ।। १७ ।।
मना राघवेंवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।।
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें ।। १८ ।।
मना सर्वथा सत्य सोडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।।
मना सर्वथा सत्य सोडूं नको रे । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ।। १९ ।।
बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तोचि मोठी ।।
निरोधें पचे कोंडलें गर्भवासीं । अधोमूखी रे दु:ख त्या बाळकासी ।। २० ।।
-- सुर्यकिरण..