Sunday, February 21, 2010 | By: सुर्यकिरण

नको विसरूस मला..



नको विसरूस मला..
 
अजूनही मी तुझाच आहे,
तुझ्या काळजाचा श्वास आहे,
नको विसरूस मला..

तुझ्या वेड्या चांदणीचा,
एकलाच असा चंद्र आहे,
तुझ्या आठवणीच्या लाटांना
कवेत घेणारा समुद्र आहे..
नको विसरूस मला..

अजूनही ठेवलाय जिंवत,
स्पर्श तुला सुखवणार्‍या मिठीचा,
अजूनही दरवळून जातो सुंगध,
तुला बेधुंद करणार्‍या कळीचा..

अजूनही मी पाहतो स्वप्ने,
तुझ्या सोबत जगलेली,
काहीशी पुर्ण तर काहीशी,
अर्धवट तुझ्या आठवणीत भिजलेली..

आजही भांडतो पावसाशी,
वैर श्रावणसरींशी मी घेतो,
तुला नजर लावणार्‍या त्या थेंबाना,
आज मी जिव्हारी गं लावतो..

आजही वाट पाहतात,
डोळे माझे पाणावलेले..
तू पाठमोरी होताना,
अक्षर: माझे गात्र क्षिणलेले..

नको विसरूस मला,
होते आपले नाते जुळलेले,
सरणावरचे प्रेतही माझे,
मोक्षासाठी तुझ्या मिठिसाठी तरसलेले...

--सुर्यकिरण--


0 प्रतिसाद..:

Post a Comment