Sunday, February 21, 2010 | By: सुर्यकिरण

"अल्विदा"


"अल्विदा"

चंद्रही नाही आज,
चांदण्याही गेल्या लपून,
कुठे हरवला वारा,
नाजूक कळ्यांना हिरमूसून..

पायवाटा दिशा हरवल्या,
अदृश्य जाहल्या सावल्या,
वाट तुझी पाहताना,
मुसमुसल्या नयन बाहूल्या..

निद्राही झाली गायब,
अन स्व्पने झाली भकास,
क्षणा क्षणाला छळतो आहे,
आठवणीचा मुका सहवास..

शब्द सारे सांडले,
भावनांशी उगाच भांडले,
तुझ्याविना सये माझ्या कवितेने,
जगासमोर दारिद्र्य मांडले..

वळूनी बघ एकदा,
तुझाच मी सखासर्वदा,
नतमस्तक माफ़ी मागतो आता,
नको म्हणूस कायमचा "अल्विदा"

-- सुर्यकिरण

0 प्रतिसाद..:

Post a Comment