Sunday, February 21, 2010 | By: सुर्यकिरण

अतृप्त...


अतृप्त....


मदनाचे घुमले वारे,
झिंग आली अता अंगा,
कुठे भेटेल मज रती,
एकदा तरी सांगा..

देही वणवा पिसाटला,
अंग अंग शहारले,
ओठांच्या या किनार्‍याला,
गुलाबी लाटांनी स्पर्शले..

श्वासांचाही सोसवेना भार,
काळीजातही धडधड होतेय,
डोळे घट्ट मिटूनी घेता,
तुझी मखमला काया खुणावतेय..

स्पर्शालाही आले उधाण,
ना उरली आता मर्यादेची जाण,
रुप तुझ अप्सरा समान,
जणू सौंदर्याची तू खाण..

होऊदे एकरूप या देही,
अगदी रोमा रोमातूनी,
पाझरूदे कुंभ प्रितरसाचे,
अगदी काठ देहाचे ओसांडूनी..

नाही निजणार काया,
जरी येईल पहाट बोलवाया,
रंगलाय आता हा खेळ प्रितीचा,
नाही शमणार धुंदवेडी काया...

-- सुर्यकिरण...

0 प्रतिसाद..:

Post a Comment